दाऊदला झटका; विश्वासू साथीदार फारुख टकलाला बेड्या

dawood-ibrahim

टीम महाराष्ट्र देशा- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारतातील सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी दणका दिला. दाऊदचा विश्वासू साथीदार फारुख टकलाला पोलिसांनी अटक केली आहे. फारुखला दुबईवरुन परत आणताच पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळावरुन अटक केली. फारुख टकलाला दुपारी टाडा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊदचा एकेकाळचा साथीदार फारुख टकला याला दुबईतून आज (गुरुवार) सकाळी मुंबईत आणलं गेलं. फारुख टकलाविरोधात 1995 साली रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. टकला यानं 93 साली मुंबईतल्या बॉम्बस्फोटानंतर भारताबाहेर पलायन केलं होतं.

Loading...

फारुख टकला हा दाऊदचा जवळचा साथीदार होता. यासिर मन्सूर मोहम्मद फारुख असे त्याचे पूर्ण नाव असून तो अंडरवर्ल्डमध्ये फारुख टकला नावाने ओळखला जातो. ‘डी कंपनी’ची दुबईतील जबाबदारी त्याच्याकडे होती, असे सांगितले जाते. 1993च्या साखळी बॉम्बस्फोटात त्याची मुख्य भूमिका होती. शस्त्रात्र उतरवणं, बॉम्ब तयार करणं यासारख्या अनेक गोष्टींमध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता. मुंबईतील स्फोटाच्या काही दिवस आधी तो भारताबाहेर निघून गेला होता.

आजवर सीबीआयने त्याला भारतात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. अखेर सीबीआयच्या प्रयत्नांना आज यश आलं. आतापर्यंत टकलाने सुरक्षा यंत्रणांना बऱ्याचदा चकवा दिला होता. याआधी तो दुबई, यूएई आणि पाकिस्तानमध्ये वास्तव्यास होता.

दरम्यान, फारुख टकलाची अटक हे सीबीआयचं मोठं यश मानलं जात आहे. टकला हा दाऊदचा जवळचा साथीदार असल्याने त्याच्याकडून दाऊदबाबतची बरीच माहिती मिळण्याची शक्यता आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी
जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणावरून मनसेतील मतभिन्नता चव्हाट्यावर