पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद

pune

पुणे : पुणे शहरात आज नव्याने ३३३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८५ हजार ०३५ इतकी झाली आहे. शहरातील १८७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७३ हजार ३१३ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात ७ हजार ७९१ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २८ लाख १६ हजार ६७५ इतकी झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ३ हजार ००७ रुग्णांपैकी २२४ रुग्ण गंभीर तर ३७२ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ७१५ इतकी झाली आहे.

तर राज्यात आज 7,302 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 7,756 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 60 लाख 16 हजार 506 इतकी झाली आहे. आज 120 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP