fbpx

महाराष्ट्र बंद: पुण्यात तोडफोड करणाऱ्या १८५ जणांना अटक

185-people-arrested-in-pune-for-creat-rucks-in-maharashtra-band

महाराष्ट्र देशा: गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान, पुण्यात झालेल्या तोडफोडप्रकरणी १८५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. काल बंदच्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली, तर चांदणी चौकामध्ये दगडफेक करण्यात आली होती.

मराठा आरक्षणाच्या मागणीवर गुरुवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता, बंदवेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनं करण्यात आले. या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड करण्यात आली. तसेच चांदणी चौकामध्ये दगडफेक करण्यात आल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. तर जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर देखील करण्यात आला.

दरम्यान, या सर्व प्रकरणात एकूण १८५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय तोडफोड प्रकरणी ८१, चांदणी चौकातील दगडफेक प्रकरणी 83, तर डेक्कन येथील रास्तारोकोमधील २१ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

3 Comments

Click here to post a comment