दोन महिन्यांत शिक्षकांच्या १८ हजार रिक्त जागा भरणार : विनोद तावडे

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आगामी दोन महिन्यांत राज्यातील शिक्षकांची १८ हजार रिक्त पदे भरणार असल्याची घोषणा सोमवारी राज्य सरकारकडून करण्यात आली. नागपूरात सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली.

Loading...

कुणालाही एक पैसा न देता पारदर्शकपणे राज्यातील शिक्षकांची भरती होणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली. ऑनलाईन पद्धतीने रिक्त जागा भरल्या जाणार असून या भरतीसाठी आरक्षणाचे निकष लागू असतील. यात खेळाडूंसाठी देखील आरक्षण असणार आहे. राज्यातील शिक्षकांसाठी दिलासा देणारा निर्णय आहे.

शिक्षक भरतीत पारदर्शकता आणण्यासाठीच ही प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात येणार असल्याचे विनोद तावडेंनी सांगितले.

स्वतंत्र कोकण विद्यापीठ प्रश्न सुटण्याच्या मार्गावर

आता मिळणार शेतीचा ‘ऑनलाईन’ सातबारा

शिक्षकांच्या बदल्या होणार ऑनलाईन पद्धतीने : पंकजा मुंडेLoading…


Loading…

Loading...