Meera Bhayander । मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला मात्र मोठी गळती लागली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकत वाढू लागली आहे. आमदारांनंतर सुरवातीला ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतील तब्बल ३० शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. तसेच पुढे कल्याण डोंबिवलीतील ५५ नगरसेवक आणि शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदेंना समर्थन दिल आहे. तर यानंतर आता मीरा भाईंदर महापालिकेत देखील शिवसेनेला मोठा फाटला बसला आहे.
मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे १८ विद्यमान नगरसेवक, शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आज 14 जुलै रोजी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हे सर्व नगरसेवक शिंदे गटात आज दाखल होत आहेत. मीरा भाईंदर शहरात गेल्या 13 वर्षात शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यात व पक्ष वाढविण्यामध्ये सरनाईक यांचा मोठा वाटा आहे. मात्र सरनाईक यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिवसेंदिवस धक्क्यांवर धक्के बसत आहेत.
दरम्यान, याआधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर ४० आमदारांनी शिंदेंना पाठिंबा दिला होता. यानंतरही अनेक कार्यकर्ते तसेच शिवसेनेतील खासदार शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटातील शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी या अगोदरही पक्षातील १२ खासदार संपर्कात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आणखीन २ खासदार संपर्कात आल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतोय.
महत्वाच्या बातम्या :
- Viral video | नाग व मुंगूसाच्या लढाईचा थरार कॅमेऱ्यात कैद
- Maharashtra Cabinet Expansion | गृह, अर्थ महत्त्वाची खाती भाजप ठेवणार? शिंदे गटात असंतोष
- Rohit Pawar : “राज्यात ओला दुष्काळ सदृश परिस्थिती”, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी
- Eknath Shinde : “बाजार समितीतील शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार”, शिंदे सरकारची घोषणा
- Viral video | पोलीस हवालदाराला चारचाकीने नेले फरफटत; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<