fbpx

सतरा ते अठरा टक्के मते मिळवणारे सत्तेत येतात; नाना पाटेकर

nana patekar

औरंगाबाद : प्रत्येक व्यक्तिला मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करायला हवे. मात्र, हल्ली पन्नास ते साठ टक्केच मतदान झाल्याने सतरा अठरा टक्के मते मिळवणारे सत्तेत येतात. त्यामुळे प्रत्येकासाठी मतदान सक्तीचे करायला हवे. तरच लोकशाहीला अर्थ आहे असे मत सुप्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले आहे. औरंगाबाद मध्ये आयोजित एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी ते बोलत होते.

नाना पाटेकर यांचा आपला माणूस हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीपासून प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या पूर्वसंधेला औरंगाबाद मध्ये त्यांचा कार्यक्रम झाला. यावेळी पुढे बोलतांना नाना म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतात. त्यांना घाबरता संकटांवर मात करायला शिकले पाहिजे. राजकीय व्यक्तींवर भाष्य करताना ते म्हणाले की, प्रत्येक जण तुम्हाला त्यांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करेल. मात्र आपण कोणालाही भिक न घालणे हेच आपले कर्तव्य आहे. आपल्या आजुबाजुच्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर  हसु पाहणे हेच प्रत्येकाच्या आयुष्याचे अंतिम ध्येय असायला हवे असेही ते म्हणाले.

nana patekar speech