महापालिका लवकरच भरणार अतिक्रमण निरिक्षकांची १६२ पदे

केवळ १६ अतिक्रमण निरीक्षक सध्या शहरातील ४० लाख लोकसंख्येसाठी काम करत आहेत.

पुणे:महापालिकेत सत्तांतर झाल्यापासून पुणे शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर स्टॉल आणि अतिक्रमणे वाढली आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने शहरात झपाट्याने बेकायदेशीर अतिक्रमने वाढत असल्याचे समोर आले आहे. आता अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी लवकरच १६२ अतिक्रमण निरीक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत.

पुणे शहराची लोकसंख्या ४० लाखांच्यावर पोहोचली आहे. शहरात अतिक्रमाणाचा विळखा दिवसेदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, या विरोधात कारवाई करण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाकडे केवळ सात लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरात जेवढे अतिक्रमण निरीक्षक असतात तेवढेच मनुष्यबळ आहे. पालिकेच्या या विभागामध्ये केवळ १६ अतिक्रमण निरीक्षक सध्या शहरातील ४० लाख लोकसंख्येसाठी काम करत आहेत. पालिकेने गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण विरोधी विभागातील रिक्त झालेली निरीक्षकांची पदे भरलीच नाहीत. मात्र आता नव्याने भरती होणाऱ्या निरीक्षकांमुळे अतिक्रमण कमी करण्यास मदत होणार आहे. या पदांच्या भरतीला २०१४ मध्ये मान्यता मिळाली आहे.

You might also like
Comments
Loading...