चीनमध्ये पुन्हा कोरोनाची लाट, युकेहून परतलेल्या त्या १६ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण

बीजिंग : चीनच्या वूहान शहरातून कोरोनाने विषाणूने सुरवात केल्यानंतर जगातील तब्बल १८०हून अधिक देशांमधेय या विषाणूने हाहाकार माजवला आहे. चीनानंतर अमेरिका, इटली, स्पेनसारख्या देशांमध्ये तर हजारो लोकांचे बळी गेले आहे. यानंतर चीनने संपूर्ण देशात लॉकडाऊन करून सर्व परिस्थिती पूर्वपदावर आणल्याचा दावा केला. मात्र आता चीनमधील परिस्थिती पूर्वपदावर येत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

‘डेली मेल युके’ने दिलेय वृत्तानुसार, चीनमधील कोरोनाबाधितांपैकी ६० टक्के लोक हे केवळ वुहानमधील आहेत. गेल्या आठवडाभर येथे कोरोनाचा एकही रुग्ण न आढळल्याने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून येथील बंदी उठवण्यास सुरुवात केली आहे. मात्र युनायटेड किंग्डममधून परतलेल्या एका १६ वर्षाच्या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे कोणतीही लक्षणं दिसत नसताना या मुलाचे रिपोर्ट्स पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिथून कोरोना परसण्यास सुरुवात झाली त्याच वुहानमध्ये पुन्हा एकदा करोना रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे परदेशातून मायदेशात परणाऱ्या व्यक्तींमुळे पुन्हा एकदा करोनाची दुसरी साथीची लाट येण्याची भिती स्थानिक प्रशासनाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कोरोना बाधित मुलाचे अडनाव झोऊ असं आहे. झोऊ युकेमधील न्यूकॅसल येथून दुबई आणि बिजिंग मार्गे वुहानला आला. ल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. मागील दिड आठवड्यांपासून वुहानमध्ये करोनाचा केवळ एकमेव रुग्ण अढळून आलेला असताना हा मुलगा वुहानमधील पहिली ‘इम्पोर्डेट केस’ म्हणजेच बाहेरुन विषाणू घेऊन येणारा व्यक्ती ठरला आहे. बिजिंगमध्ये परदेशातून येणाऱ्या सर्व नागरिकांची चाचणी करुनच त्यांना सोडण्यात येत आहे. करोनाच्या संसर्गाची दुसरी लाट येण्याची भिती असल्याने ही खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान, युकेमधून चीनमध्ये आलेल्या ६९१ चीनी नागरिकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालं आहे. बिजींग विमानतळावर करोनाचे निदान झालेल्या एकूण रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण हे ब्रिटनमधून आल्याचे सरकारी आकडेवारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. ब्रिटनबरोबर इटली आणि स्पेनमधून आलेल्या प्रवाशांनाही करोना असल्याचे सिद्ध झालं आहे.