fbpx

पुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी

पुणे – पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समिविष्ट झालेल्या गावातील लोकसंख्या आणि ग्रामीण भागातून शहराकडे वाढता लोंढा लक्षात घेऊन शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा, अशी मागणी कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.

महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये 1197 मध्ये पाणी पुरवठ्याचा करार झाला होता. त्यावेळी शहराची लोकसंख्या 22 लाख होती. आता ती 55 लाखाच्या घरात पोहोचल्याने या वाढीव पाणीपुरवठ्याची मागणी करण्यात आली आहे.