नोकरभरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण – मुख्यमंत्री

72 हजार नोकरभरतीत असणार मराठा समाजासाठी 16 टक्के जागा राखीव

नागपूर : शासनाच्या 72 हजार जागांच्या मेगा भरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात येईल. यासाठी उच्च न्यायालयात यावर निर्णय झाल्यावर या राखीव पदासंदर्भात निर्णय घेता येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक आंदोलन सुरू केलंय. याबाबत विरोधकांनीही सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलं आहे.

आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकारकडून नव्या नोक-यांमध्ये मराठा समाजासाठी 16 टक्के जागा आरक्षित ठेवल्या जाणार आहेत. मराठा आरक्षणाचा निर्णय सध्या उच्च न्यायालयाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर हा बॅकलॉग भरला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विठ्ठलाची पूजा करण्यापासून मुख्यमंत्र्यांना मराठा क्रांती मोर्चा अडविणार

मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका : धनंजय मुंडे

 

You might also like
Comments
Loading...