मराठा समाजासाठी 16 टक्के अनुशेष हे तर विरोधी पक्षांचे यश : विखे पाटील

vikhe patil

नागपूर : शासनाच्या 72 हजार जागांच्या मेगा भरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात येईल. यासाठी उच्च न्यायालयात यावर निर्णय झाल्यावर या राखीव पदासंदर्भात निर्णय घेता येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करताच आता राजकारणाला आणि श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या नोकरभरतीत मराठा समाजासाठी 16 टक्के जागा रिक्त ठेवून आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर अनुशेष म्हणून त्या जागा भरण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, हे विरोधी पक्षांचे मोठे यश असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाने आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक आंदोलन सुरू केलंय. याबाबत विरोधकांनीही सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकारकडून नव्या नोक-यांमध्ये मराठा समाजासाठी 16 टक्के जागा आरक्षित ठेवल्या जाणार आहेत. मराठा आरक्षणाचा निर्णय सध्या उच्च न्यायालयाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर हा बॅकलॉग भरला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा करीत असल्याची भावना सर्वत्र निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय अद्याप प्रलंबित असताना सरकारने नोकरभरती जाहीर केली. त्यामुळे या नोकरभरतीत मराठा समाजाला आरक्षणाचे लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, सरकारने यासंदर्भात तातडीने भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी केली .

राज्य सरकारच्या नोकरभरतीत मराठा समाजासाठी 16 टक्के जागा रिक्त ठेवून आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर अनुशेष म्हणून त्या जागा भरण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, हे विरोधी पक्षांचे मोठे यश असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे.