उपराष्ट्रपती निवडणूक रंगीत तालमी दरम्यान १६ भाजप खासदारांची चूक; अमित शहांकडून खडेबोल

BJP-580x395

वेबटीम : उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान घेतले जात आहे. राष्ट्रपती निवडणुकीत तब्बल २१ खासदारांचे मतदान अवैद्य ठरल्याने उपराष्ट्रपती निवडणुकीत हि चूक टाळण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून काल ‘मतदान कसे करावे’ यावर खासदारांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मतदान प्रक्रियेचा सरावही करण्यात आला . रंगीत तालीम करूनही १६ खासदारांनी मतदान करताना यात चूक केली, त्यामुळे त्यांची मते अवैध ठरवण्यात आली. या सर्व प्रकारावरून कार्यशाळेला उपस्थित असणारे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी चुकलेल्या खासदारांची चांगलीच खरडपट्टी केल्याच समोर आल आहे.

“सराव करूनही मतदान करताने चुकणे ही बाब खूपच लाजिरवाणी आहे. तुम्ही १५-१६ लाख लोकांचे प्रतिनिधित्व करता आणि तरीही मतदान करताना चुका करता” म्हणत अमित शहा यांनी खासदारांना चागलेच खडेबोल सुनावले आहेत.

मतदान करताना चुकलेल्या १६ खासदारां पैकी ६ खासदारांनी तर पूर्ण प्रक्रियेमध्येच चूक केली. पाच जणांना नवीन मतपत्रिका मागवाव्या लागल्या. तसेच इतर खासदारांनी अशी चूक केली कि यावर विरोधीपक्षांनी दबाव आणला असता तर अशी मते अवैध ठरवली असती.