154 नरेंद्र मोदी करणार गुजरात निवडणुकीत मतदान

gujarat_modi

अहमदाबाद – अस म्हणल जात कि जगात एक सारखे दिसणारे ७ लोक असतात. मात्र एकाच नावचे किती लोक असू शकतात हे कोणी सांगू शकत नाही. याचच चित्र सध्या गुजरातमधील निवडणुक मतदार यादीत दिसून येत आहे. कारण डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणे नाव असणारे आणखीन 154 नरेंद्र मोदी मतदान करणार आहेत.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले आणि त्याच्या नावाची जगभरात मोठी क्रेझ निर्माण झाली आहे.  मात्र या आधीच तब्बल १५४ नरेंद्र मोदी नाव असणारे नागरिक गुजरातमध्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव ज्या अहमदाबाद जिल्ह्याच्या मतदार यादीत आहे. त्याच यादीत सर्वाधिक नरेंद्र मोदी नाव असणाऱ्यांची संख्या आहे. त्या खालोखाल मेहसाना जिल्हात 24 भरुचमध्ये 16 तर सुरतमध्ये 15 नरेंद्र मोदी मतदान करणार आहेत. आणखीन काही मतदार संघात नरेंद्र मोदी नाव असणारे आणखीन मतदार आहेत.