‘निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करणार’, मुख्यमंत्र्यांची घोषणा

uddhav thakre

औरंगाबाद: मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुक्तिसंग्राम दिन निमित्त मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करत मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा त्यांनी केल्या आहेत. यावेळी त्यांनी निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता निजामकालीन शाळांचे कायापालट होणार आहे. यावेळी त्यांनी इतरही अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

मराठवाड्यात जागतिक पातळीवरील संतपीठ व्हावे अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास याची घोषणा करत त्यांनी औरंगाबाद आणि अहमदनगर रेल्वेने जोडण्याचं रेल्वे राज्यमंत्र्यांना आवाहन केले आहे. तसेच औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरु करण्याची संकल्पनाही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच मराठवाड्यासाठी 200 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारणार असून घृष्णेश्वर सभामंडपचे नूतनीकरणही करण्यात येणार आहे. दरम्यान औरंगाबादला समुद्र नाही पण समुद्रासारखी पर्यटन आहेत. असे म्हणत त्यांनी औरंगाबादचे पर्यटन समृद्ध करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आज ज्याने ज्याने मला धन्यवाद म्हणून बोर्ड दाखवले, त्यांना मला सांगायचं आहे की आमचा विकास आता सुरु झाला आहे, आणि अजून खूप होणार आहे. बोलघेवडे सरकार काही कामाचं नसतं, असे म्हणत त्यांनी कानपिचक्याही लगावल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या