मुंबई ; मराठा मोर्च्यात सामील होणार १५ हजारांच्यावर मुस्लिम बांधव

मुंबई : मुंबईमध्ये होणाऱ्या ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्च्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यभरातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव राजधानी मुंबईकडे येत आहेत. आता मुंबई येथे निघणाऱ्या मराठा मोर्चाला मुस्लीम संघटनांनी पाठिंबा दिला आहे. राणीबाग ते आझाद मैदान दरम्यान मुस्लिम समाजाची लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहेत. या विभागातून मोर्चा निघणार असल्याने ठीक ठिकाणी बॅनर, होर्डिंग, कटआउट्स लावून मोर्चेकऱ्यांचे स्वागत केले जाणार आहे.

मोर्चाच्या मार्गावर सहभागी लोकांना पाण्याचे पाऊच वाटण्यात येणार असल्याची माहिती लाईफ इन लाईट व छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड या संघटनेचे मोहम्मद शकील पटणी, बिना ठाकूर, अजित नरभवने यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोर्चामध्ये संघटनेचे १५ हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यावेळी मुस्लिम समाजाला उच्च न्यायालयाने शिक्षणात आरक्षण दिले असले तरी सध्याचे राज्य सरकार आरक्षण देईल असे वाटत नसल्याने मराठा समाजाचीही आरक्षणाची मागणी असल्याने त्यांना पाठिंबा देत असल्याचे सांगण्यात आले.

 

You might also like
Comments
Loading...