जिल्हा परिषद शाळातल्या १५ टक्के शिक्षकांच्या यंदाही बदल्या होणार

z p school teacher

मुंबई- राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यंदाही होणार आहेत. जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या राज्य शासनाच्या धोरणानुसार १५ टक्के मर्यादेपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पद्धतीने तर जिल्ह्यांतर्गत बदल्या ह्या ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी तालुका स्तरावर वेगवेगळी पथकं नेमून अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जिल्हा परिषदेतल्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्याही १५ टक्केच्या मर्यादेत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

आंतरजिल्हा बदली प्रक्रिया जलद गतीने राबविण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कामासाठी पुणे व चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवश्यक सहकार्य करण्याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

महाविकास आघाडीच्या या निर्णयाला माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कडाडून विरोध केला आहे. ‘कोरोनाच्या धर्तीवर शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पद्धतीने होणार असे ऐकले,ज्याचा वशिला नाही,वाली नाही आणि त्या गरीब शिक्षकांसाठी हा ऑफलाईनचा निर्णय कोरोनाच्या संकटात आणखी संकट आणेल राज्यसरकार ने यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे..पारदर्शकता आणि मेरिट सोडून भ्रष्टाचार व शोषण होईल’. अस मत पंकजा मुंडे यांनी मांडल आहे.

महत्वाच्या बातम्या-

नगरच्या राजकारणाचा सुसंकृत किस्सा : ‘तोपर्यंत’ तरी सुजय विखे अन् संग्राम जगतापांचा याराना…

संजय राऊत, सुशांत सुशांत सिंह राजपूतला ‘हा’ रोल करणार होते ऑफर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्र्यांप्रमाणे रझा अकादमीची पाठराखण करतात का?

आघाडीत बिघाडी : सरकार आघाडीचे आहे याची काळजी घ्या, राहुल गांधींच्या खास व्यक्तीने खडसावले