fbpx

गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा भ्याड हल्ला, १५ जवान शहीद

टीम महाराष्ट्र देशा : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाला गालगोट लागले आहे. आज माओवाद्यांनी सी-६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.या हल्ल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.

दरम्यान ,गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दानापूरमध्ये माओवाद्यांनी तब्बल ३० वाहने जाळली होती. या घटनेत ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त अधिक मालमत्तेचं नुकसान झालं असल्याची माहिती आहे. माओवाद्यांनी केलेल्या या कृत्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.