हे घ्या ‘अच्छे दिन’ ; नोटाबंदीमुळे गमवावी लागली १५ लाख लोंकांना नोकरी

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’(CMIE)ने केलेल्या पाहणीतून आली ही धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली : काळा पैसा रोखण्यासाठी आणि काळ्या पैशांवर रोख लावण्यासाठी केंद्र सरकारने नोटाबंदी चा ऎतिहासिक निर्णय घेतला होता. या नोटाबंदीचा फटका नोकरदार वर्गांना सगळ्यात जास्त बसला असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे अवघ्या चार महिन्यांत 15 लाख लोकांना नोकरी गमवावी लागली आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (CMIE)ने केलेल्या एका पाहणीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीवर त्याच्या घरातील चार लोक अवलंबून असतात. त्यामुळं 15 लाख बेरोजगारांचा हिशेब केल्यास एकूण 60 लाख लोकांच्या तोंडचा घास नोटाबंदीनं हिरावून घेतला आहे, असं ‘सीएमआयई’च्या अहवालात म्हटलं आहे.
‘कंज्युमर पिरामिड हाउसहोल्ड’ या नावाखाली हा सर्वे करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जानेवारी ते एप्रिल 2017 या दरम्यान देशातील एकूण 40 कोटी 50 लाख नोकऱ्या राहिल्या आहेत. त्याआधी सप्टेंबर ते डिसेंबर २०१६ दरम्यान 40 कोटी 65 लाख नोकऱ्या होत्या. त्या आधारे नोटाबंदीच्या निर्णयानंतर चार महिन्यांत जवळजवळ 15 लाख लोक बेरोजगार झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणाअंतर्गत जानेवारी ते एप्रिल 2016 दरम्यान तरुणांना मिळणारा रोजगार व त्यांच्या बेरोजगारीसंबंधीचे आकडे गोळा केले आहेत. हा सर्वे करताना 1 लाख 61 हजार घरातील 5 लाख 19 हजार तरुणांसोबत नोकरीसंदर्भात चर्चा केली. नोटाबंदीआधी 40 कोटी 65 लाख लोकांकडे रोजगार होता, परंतु नोटाबंदीनंतर 40 कोटी 50 लाख लोकांकडे रोजगार राहिला आहे, असं अहवालात म्हटलं आहे.

You might also like
Comments
Loading...