राज्यातील 15 लाख 42 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे 6500 कोटी भरले – मुख्यमंत्री

वारणानगर: राज्यातील शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली कर्जमाफी आधारच्या माध्यमातून करुन पारदर्शी कर्जमाफी करण्यावर भर दिला. महाराष्ट्रातील 15 लाख 42 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे 6 हजार 500 कोटी रुपये आजच भरले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच पुढील काही दिवसांत  पुन्हा 10 लाख शेतकऱ्यांची यादी अशा पध्दतीने कर्जमाफीचे काम येत्या 10 ते 15 दिवसात पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजच्या पटांगणावर श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या दिलखुलास…मुक्त संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. समारंभास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वारणा उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे हेही उपस्थित होते.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की. ‘राज्यातील अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवून वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या खात्यावर या योजनेंतर्गत त्यांना 25 हजार रुपयापर्यंतची मदत जाहिर केली असून राज्याच्या अर्थ व्यवस्थेची साथ मिळाल्यास नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अजूनही जास्तीची मदत करण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...