ब्रिज पडत असल्याच्या अफवेने एल्फिन्स्टन रोड स्टेशनवर चेंगराचेंगरी,पंधरा जण ठार

stampede-at-parel-railway-station-bridge

कायम प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर अचानक चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये श्वास गुदमरुन 15 जणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर जखमींवर परळमधील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सकाळी 10.45 वाजताच्या सुमारास हा ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवेने ब्रिजवरील प्रवाशांनी भीतीने पळापळ केल्याने चेंगराचेंगरी झाली.

दरम्यान पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे..