उठाबशांची विद्यार्थिनीला शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी

kolhapur principle

कोल्हापूर : विद्यार्थिनीला 500 उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेस 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे कोल्हापुरात विद्यार्थिनीला उठबशा काढायला लावणाऱ्या मुख्याध्यापिकेला आज अटक करण्यात आली. त्यानंतर या मुख्याध्यापिकेला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. अश्विनी देवाण असं अटक केलेल्या मुख्याध्यापिकेचं नाव असून या मुख्याध्यापिकेने चंदगड तालुक्यातल्या कानूरच्या भावेश्वरी विद्यालयात गृहपाठ न केल्यामुळे आठवीत शिकणाऱ्या विजया चौगुले या विद्यार्थिनीला तब्बल 500 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती.

विजयाची प्रकृती बिघडल्याने तिच्या वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. शिक्षेमुळे विद्यार्थिनी अत्यवस्थ आहे. तिच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.