औरंगाबाद:शासन निधीतून शहरातील अनेक रस्ते गुळगुळीत झाले असले तरी विजेच्या खांबाचा अडथळा कायम होता. जिल्हा नियोजन समितीमार्फत रस्त्यावरील धोकादायक खांब हटविण्यासाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार डाव्या बाजूच्या वळणासह इतर खांब हटविण्यासाठी महापालिकेतर्फे वीज वितरण कंपनीला याद्या दिल्या जाणार आहेत.
महापालिकेने तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या कार्यकाळात शहरात रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली होती. त्यावेळी हजारो मालमत्तांवर बुलडोझर फिरवून रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यात आला. पण रस्त्यावरील खांब जशास तसे उभे आहेत. या खांब, रोहित्राचा आधार घेऊन अनेक जण पुन्हा रस्त्यावर अतिक्रमणे करत आहेत. दरम्यान राज्य शासनाने महापालिकेला शहरातील रस्त्यांची कामे करण्यासाठी अनुक्रमे २५, १०० व १५२ कोटी रुपयांचा निधी दिला. त्यातून गेल्या काही वर्षांत रस्त्यांची व्हाईट टॉपिंग पद्धतीने कामे करण्यात आली. ही कामे करताना देखील रस्त्यात आलेल्या विजेच्या खांबाचा विचार झालेला नव्हता. आजही रस्त्यावरील खांबामुळे छोटेमोठे अपघात होतात. अनेकवेळा वाहनधारकांना दोन खांबाच्या मधून रस्ता काढावा लागतो. रस्ते गुळगुळीत अन् मधोमध खांब असे चित्र काही रस्त्यावर आहे.
धोकादायक बनलेले हे खांब हटविण्याच्या विषयावर केवळ चर्चाच सुरू होती. हे खांब, रोहित्र हटविण्यासाठी वीज वितरण कंपनीमार्फत महापालिकेला कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली. महापालिकेने काही रस्त्यांसाठी पैसे देखील भरले. पण त्या रस्त्यावरील अडथळे पूर्णपणे निघाले नसल्याने पुढील पैसे देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यात आता जिल्हा नियोजन समितीमार्फत महापालिकेला १५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून बहुतांश रस्ते मोकळे होतील, असे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए. बी. देशमुख यांनी सांगितले. गुरुवारी रस्ते विभागाचे कार्यकारी अभियंता बी. डी. फड, उपअभियंता मोहिनी गायकवाड व वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात बैठक झाल्याचे देशमुख यांनी नमूद केले.
महत्वाच्या बातम्या:
-
नायलॉन मांजामुळे ‘करकोचा’ने गमावला जीव; प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात झाले अंत्यसंस्कार!
-
पंतप्रधानांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “प्रत्येकाने…”
- “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…”, फडणवीसांची शरद पवारांवर टीका
- “…म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडल्याचे लक्षण”,किरण मानेंच्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंची टीका
- नाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण; हायव्होल्टेज तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<