राज्यात पूर आणि दरड कोसळून १४९ जणांचा मृत्यू; १०० नागरिक बेपत्ता

poladpur

मुंबई : कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रायगडमध्ये तुफान अतिवृष्टी झाली. यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहे. तसेच अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तर पुरानेही चांगलेच थैमान घातले. राज्यात दरड कोसळून आणि पूरग्रस्त भागात आतापर्यंत १४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1१०० जण अजूनही बेपत्ता आहे. या दुर्घटनेत तब्बल ३ हजार २४८ जनावरे दगावल्याची माहिती समोर आली आहे.

राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने दिलेल्या माहितीनूसार, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेतून सुमारे २ लाख ३० हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण १४९ जणांचे मृत्यू झाले आहे. तसेच ५० जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे आहेत.

राज्यातील मृतांची संख्या
रायगड, ६० सातारा, ४१, रत्नागिरी २१, ठाणे १२, कोल्हापूर ७, मुंबई उपनगरे ४, सिंधुदुर्ग २, पुणे २

आढावा घेऊनच नुकसान भरपाई जाहीर करणार
‘केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल,’ असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रविवारी चिपळूण येथे सांगितले. वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्ह्याच्या स्तरावर याबाबत यंत्रणा उभारण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

महत्त्वाच्या बातम्या