मावळात तीन महिन्यात 1400 कोटींचा निधी – राज्यमंत्री बाळा भेगडे

blank

मावळ-  महाराष्ट्र शासन मध्ये राज्यमंत्री झाल्यापासून तीन महिन्यांत मावळ तालुक्यात एकूण 1400 कोटींचा निधी विविध विकास कामाकरिता आणला आहे. जर नागरिकांनी साथ देऊन तालुक्याच्या विकासासाठी निवडून दिले तर मावळ तालुक्याचे चित्र नक्कीच बदलेल असा विश्वास राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी गाव भेटीच्या प्रचारादरम्यान व्यक्त केला आहे.

गुरुवारी काही ठिकाणी गावात बाळा भेगडे यांनी स्वतः दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवत प्रचार केला.आज वाडीवळे, बुधवडी, सांगिसे, वेल्हवळी, नेसावे, खांडशी, उंबरवाडी, भाजगाव, कोळवाडी, वळवंती, उकसान, पाले नामा, गोवित्री, सावळेवाडी, करंजगाव, ब्राम्हणवाडी, मोरमारवाडी, कांबरे, कोंडीवडे, नाणे, नवीन उकसान, नाणोली, साई, वाउंड, कचरेवाडी, घोणशेत, ठिकाणी कामे पूर्ण होत असल्याने आणि काही कामांचे उदघाटन झाल्याने नागरिकांनी भेगडे यांचा सन्मान करत भाजपलाच मतदान करणार असल्याचे जाहीर केले. प्रचारादरम्यान गावागावांत युवकांनी भेगडे यांना खांद्यावर बसवून गावातून जल्लोषात मिरवणूक काढली. युवकांच्या स्वागताने भरवलेल्या भेगडे यांनी माझा तालुका हेच माझे कुटुंब असल्याचे सांगत नागरीकांच्या स्वागताचा स्वीकार केला.

आत्तापर्यंत चालू झालेल्या वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेतल्याचेही काही ग्रामस्थांनी यावेळी मान्य केले. सरकारी सोयीसुविधांचा लाभ हा सर्व नागरिकांनी घ्यावा असेही यावेळी भेगडे यांनी सांगितले. तालुक्यातील गावांमध्ये रस्ते, शाळा, पाटबंधारे, स्मशानभूमी आणि गावचे सभामंडपाचे काम पूर्ण झाले आहे आणि काही ठिकाणी नुकतेच उदघाटन झाल्याचेही चित्र गावकऱ्यांच्या मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादावरून दिसून येत होते. नेहमीप्रमाणे भेगडे यांच्या येण्याची चाहूल लागताच नागरिक त्यांना थांबवून त्यांचा सन्मान करीत असल्याचे दृश्य बऱ्याच ठिकाणी दिसले. भेगडे यांनाही सर्वांचा आदर करीत सर्वांच्या विनंतीला मान दिल्याने सर्व नागरिक आनंदित झाल्याचे चित्र दिसत होते.

महत्वाच्या बातम्या