१४ लोकांचा बळी आगीच्या खेळामुळेच : मुंबई अग्निशमन दल अहवाल

आगीच्या खेळामुळे ही आग लागली आणि हुक्क्याच्या निखाऱ्यामुळे अधिक भडकल्याचं अहवालात नमूद

मुंबई : कमला मिलमधील मोजो आणि वन अबव्ह या रेस्टोपब्सना लागलेली आग ही आगीच्या खेळामुळे लागली असल्याचा अहवाल मुंबई अग्निशमन दलाने दिला आहे. कमला मिल मधील अग्नितांडवमध्ये १४ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आग का लागण्याच्या प्रश्नावरून तर्कवितर्क लावले जात होते. आगीच्या खेळामुळे ही आग लागली आणि हुक्क्याच्या निखाऱ्यामुळे अधिक भडकल्याचं सांगण्यात येत आहे.

bagdure

मोजो पबमध्ये सुरू असलेल्या आगीच्या खेळामुळे ही भीषण आग लागल्याचा हा अहवाल आहे. ३० डिसेंबर २०१७ रोजी लागलेल्या या आगीत 14 जणांचा बळी गेला होता. त्याचबरोबर मोजोतील अग्निशमन यंत्रणेत त्रुटी असल्याचंही अग्निशमन दलाने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

You might also like
Comments
Loading...