कोल्हापूर हिंसाचारा प्रकरणी १३४ जणांना अटक

Vishwas-Nangre-Patil

कोल्हापूर : कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारानंतर आंबेडकरी संघटनांकडून संपूर्ण महाराष्ट्रात बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या. तसेच कोल्हापूर शहरात बंदला हिंसक स्वरूप प्राप्त झाले होते. कोल्हापूर शहरात तोडफोड, दगडफेकीच्या घटनांमध्ये काळे धंदेवाले सराईत गुन्हेगार सक्रिय असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर हिंसाचारात दोषी असलेल्यांचे अटकसत्र सुरु असून आजपर्यंत १३४ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच भीमा कोरेगाव येथील हिंसाचारप्रकरणी ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.