चांगली बातमी : पाकिस्तान मध्ये अडकलेले तब्ब्ल १३३ भारतीय नागरिक परतनार मायदेशी

नवी दिल्ली :भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने नुकतेच एक ट्वीट केलं आहे.त्यात त्यांनी असे म्हटले आहे की ‘पाकिस्तान ३६३ नो ऑब्जेक्शन टू रिटर्न टू इंडिया’ व्हिसा धारक आणि ३७ भारतीय नागरिकांसह एकूण १३३ नागरिकांना भारतात परत पाठवणार आहे.

यानुसार माहितीनुसार पाकिस्तानमध्ये अडकलेले एकूण १३३ भारतीय नागरिक मायदेशी परतणार आहेत. येत्या सोमवारी म्हणजेच १९ ऑक्टोंबर रोजी ते नागरिक वाघा बॉर्डरवरुन भारतात येतील. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे.

भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं इस्लामाबादमधील उच्च न्यायालयात एक याचिका दाकल केली होती. यामध्ये ४ भारतीय नागरिकांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. चारही नागरिकांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यामुळं त्यांना भारतात जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यात करण्यात आली होती.

या भारतीय नागरिकांनी कसे परत पोहोचावे याबाबत मार्गदर्शक सूचना देखील जरी करण्यात आलेल्या आहेत.