ऑनलाईन तक्रारी करण्यात पुणेकर अग्रेसर ; आचारसंहिता भंगाच्या १३३ तक्रारी दाखल

टीम महाराष्ट्र देशा : निवडणूक शांततेत पार पडावी  यासाठी आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेचा कोणी भंग करू नये आणि तसे कोणी केल्यास याची तक्रार नागरिकांना करता यावी यासाठी निवडणूक आयोगाने सी व्हिजिल हे अँप उपलब्ध करून दिले आहे.
आत्तापर्यंत या अँपवर आचारसंहिता भंगाच्या तब्बल ७१७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर त्यातील सर्वाधिक तक्रारी या पुणे जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. ७१७ तक्रारींपैकी १३३ तक्रारी या पुणे जिल्ह्यातील असल्याने येथे नियमभंग करणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे.

काय आहे हे अँप ?

Loading...

-सी व्हिजिल (cVIGIL) नावाचे हे अँप असून नागरिक याच्या मदतीने स्वतःची ओळख लपवून तक्रार नोंदवू शकतात.
-गुगल प्ले स्टोअर वरून हे अँप डाउनलोड करता येते
-फोटो आणि व्हिडीओ च्या मदतीने देखील तक्रार देता येते.
-तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येते.

मतदारांना पैसे, मद्य, अमली पदार्थांचे वाटप करणे, चिथावणीखोर भाषण, शस्त्रांचा वापर, पेड न्यूज, भेटवस्तू किंवा पैशांचे अमिश दाखवणे, मतदारांना मारहाण तसेच धमक्या अशा अनेक प्रकारच्या तक्रारी या अँप च्या मदतीने नागरिक करू शकतात. आत्तापर्यंत २९४ तक्रारींवर कारवाई देखील करण्यात आलेली आहे. कोणताही गैरप्रकार घडताना दिसताच नागरिकांनी आपल्या मोबाईलचा वापर करत या आपच्या मदतीने तक्रार करणे गरजेचे आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करताना कोणीही विचार करेल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी