fbpx

‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’

टीम महाराष्ट्र देशा : भारतात पुलवामासारखे हल्ले होतातच, त्यामुळे संपूर्ण देशाला जबाबदार धरत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे आहे, असे मत काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले आहे. पित्रोदा यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला असून कॉंग्रेसवर आता चौफेर टीका होऊ लागली आहे.

पित्रोदा म्हणाले की, मुंबईवर २६/११ चा हल्ला झाला. त्यावेळी आम्हीदेखील (काँग्रेस) विमानं पाठवू शकत होतो. परंतु हे चुकीचे आहे. तुम्ही अशाप्रकारे वागू शकत नाही, असे म्हणत पित्रोदांनी अप्रत्यक्षपणे एअर स्ट्राईकवर टीका केली आहे. एअर स्ट्राईक करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर कॉंग्रेसने सरकारला पूर्ण सहयोग करण्याचा शब्द कॉंग्रेसने दिला होता. मात्र, त्यानंतर वारंवार सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पुलवामा हल्ल्यासंदर्भात पित्रोदा यांनी केलेलं विधान लज्जास्पद असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत म्हटलं आहे की,’सॅम पित्रोदा यांनी भारतीय लष्कराचा अपमान केला आहे. 130 कोटी जनता काँग्रेसला माफ करणार नाही असं म्हटलं आहे. विरोधकांकडून वारंवार आपल्या जवानांचा अपमान केला जात आहे. जनता काँग्रेसला माफ करणार नाही असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.