राज्यातील १३ हजार शाळा वीजेपासून वंचित : शशिकांत शिंदे

४४ हजारपेक्षा जास्त विदयार्थ्यांना संगणकच माहित नाही...

नागपूर : राज्यातील १३ हजार ८४४ शाळांमध्ये अद्यापपर्यंत वीज पोहोचली नाही. ४४ हजार ३३० शाळातील विद्यार्थ्यांना संगणक म्हणजे काय हेच माहिती नाही अशी धक्कादायक माहिती विधीमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहासमोर आणली.

शाळांमध्ये डिजिटल क्लासरुम असावा अशी जनतेची मागणी आहे. पण यासाठी निधी अपूरा पडत आहे. याआधी केंद्रातून पैसे येत होते पण आता ते पैसे येणेच बंद झाले आहे. त्यामुळे शाळांमधील डिजिटल क्लासरुममधील परिस्थिती वाईट आहे. डिजिटल क्लासरूमसाठी बजेटमध्ये तरतूद करावी अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.

राज्यातील या शाळांना नीट विद्युत पुरवठा नाही, एमएसईबी या शाळांना खासगी दर लावत आहे. या शाळांचा विद्युत पुरवठा नीट करावा आणि या शाळांसाठी वीजदर कमी करावेत व निधी वाढवून मिळवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणीही शशिकांत शिंदे यांनी केली.

‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा

Rohan Deshmukh

 राष्ट्रवादीचे आ.बबनराव शिंदे भाजपाच्या वाटेवर ?

माऊलींच्या पालखीचा दिवे घाटातून प्रवास

Latur Advt
You might also like
Comments
Loading...