महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी १३ हजार ५०६ घरे मंजूर

नवी दिल्ली : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी )अंतर्गत महाराष्ट्रातील १५ शहरांतील गरिबांसाठी १३ हजार ५०६ घरे मंजूर झाली आहेत. देशात एकूण १ लाख ५० हजार  घरे मंजूर करण्यात आली आहेत.

केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या ३४ व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील १५ शहरातील गरिबांसाठी  ६४३ कोटींची गुंतवणूक आणि  केंद्राच्या २०१ कोटींच्या सहाय्यासह १३ हजार ५०६ घरे मंजूर करण्यात आली आहेत.

Loading...

महाराष्ट्रातील या शहरांचा समावेश

राज्यातील पुणे जिल्ह्यातील पिंपरी वाघिरे, वाघोली आणि म्हाळुंगे तसेच शिरुर तालुक्यातील वाढु, हवेली तालुक्यातील वेळू व वडगाव. अकोला जिल्ह्यातील अकोट, चंद्रपूर शहर, नांदेड जिल्ह्यातील नांदेड वाघाळा, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सातारा शहर, नाशिक शहर, सोलापूर शहर, अहमदनगर जिल्ह्यातील राहाता, कर्जत आणि पाथर्डी तसेच उस्मानाबाद शहर या शहरांमध्ये वर्ष २०१७-१८ साठी एकूण १३ हजार ५०६ घरे मंजूर झाली आहेत.

या बैठकीत ७ हजार २२७ कोटींची गुंतवणूक व २ हजार २०९ कोटींच्या अर्थ सहाय्यासह देशभरातील १० राज्यांच्या ३७०  शहरांसाठी १ लाख ५० हजार  घरे मंजूर करण्यात आली आहेत .

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रडत राऊतांमुळे यापुढे सामना बंद,बंद,बंद : मनसे
माझं कुणी काहीच ' वाकडं ' करू शकत नाही : संजय राऊत