नक्षलवाद विरोधी अभियानात पोलिसांना आज मोठे यश, गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा खात्मा

naxal

टीम महाराष्ट्र देशा- नक्षलवाद विरोधी अभियानात पोलिसांना आज मोठे यश मिळाले असून, पोलिसांनी केलेल्या कारवाईत 13 नक्षलवादी ठार झाले आहेत.डीव्हीसीचे सदस्य असलेले साईनाथ आणि सिनू या दोघांनाही ठार मारण्यात आलं. राज्यातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. गेल्या चार वर्षातील नक्षलवाद्यांविरोधातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले आहे.

भामरागड तालुका हा नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या चकमकीत १४ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीनंतर जंगलात कोम्बिंग ऑपरेशन चालू करण्यात आले आहे. ताडगाव जंगलात नक्षलवादी दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती.

साईनाथ हा पेरीमिली दलम कमांडर, त्याला डिव्हीजनल कमिटी सदस्य बनवण्यात आलं होतं. साईनाथ अत्यंत सक्रिय होता. त्याचं वय 35 वर्षांच्या घरात होतं. सातत्याने गडचिरोलीत होत असलेल्या अनेक नक्षली कारवाया आणि हत्याकांडाचा तो सूत्रधार होता.43 वर्षांचा सिनू हा मूळ वारंगलचा असून त्याचं खरं नाव विजयेंद्र राऊते. सुरुवातीला तो आंध्र प्रदेशमध्ये कार्यरत होता. 2003 मध्ये गडचिरोलीत तो दाखल झाला.अनेक जबाबदाऱ्या पार पाडत काही वर्षांपासून तो दक्षिण गडचिरोली डिव्हीजनचा सचिव झाला. सिनूची पत्नीही नक्षल चळवळीत असल्याची माहिती आहे. मात्र ती पैसे घेऊन पळाल्यामुळे चळवळीत त्यांच्याविरोधात असंतोष होता.