‘असा’ पहा बारावीचा ऑनलाईन निकाल

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार असून, दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल घोषित करण्यात येईल.

दरम्यान बारावीचा निकाल कधी लागणार याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशलमीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होती. अशा अफवांवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेऊ नये, मंडळाच्या वतीने लवकरच अधिकृत तारखेची घोषणा करण्यात येईल, असं आव्हान देखील करण्यात आलं होतं. दरम्यान आज १२ वीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद,मुंबई, अमरावती,नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागातर्फे फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ mahresult.nic.in, mahresult.nic.in, results.nic.in यावर पाहता येणार आहे.

You might also like
Comments
Loading...