बारावीचा निकाल जाहीर; यंदाही राज्यात मुलींचीचं बाजी

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, राज्याचा एकूण निकाल ८८.४१ टक्के लागला आहे. यंदाही राज्यात मुलींनीच बाजी मारलीये. मुलींचा निकाल ९२.३६ टक्के तर मुलांचा निकाल ८५.२३टक्के एवढा लागला आहे.

दरम्यान मंडळाच्या वतीने विभागानुसार निकाल जाहीर करण्यात आला असून, दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. यावर्षी कोकण विभागाचा निकाल ९४.८५ ,कोल्हापूर – ९१.००, पुणे – ८९.५८, औरंगाबाद – ८८.७४, लातूर- ८८.३१, अमरावती – ८८.०८, नागपूर – ८७.५७, मुंबई – ८७.४४ आणि नाशिक – ८६.१३ टक्के असा निकाल लागला आहे.