तब्बल १२७ कोटींचा घोटाळा आणि २७०० पानी पुरावे; मंत्री मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांचे आरोप

hasan mushrfi vs kirit somaiya

मुंबई : शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री माझ्या रडारवर आहेत, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. आज म्हणजेच सोमवारी यातील एका मंत्र्याचा भ्रष्टाचार माध्यमांसमोर उघडे करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितलं होतं. यानंतर सबंध महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये तर्क-वितर्क लावले जात होते.

अखेर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन तो राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री कोण हे जाहीर केलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यासह त्यांचे पुत्र नावीद मुश्रीफ, हसन मुश्रीफ यांच्या पत्नी या देखील या भ्रष्टाचारात सामील असल्याचं म्हटलं. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहारातून तब्बल १०० कोटींहून अधिकच भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.

यावेळी सोमय्या म्हणाले, ‘मी राज्य सरकारमधील ११ भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. पण दुर्दैवाने ११ जणांच्या टीममध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढायला लागली आहे. हसन मुश्रीफ यांचं नाव राखीव खेळाडूंमध्ये आम्ही वाढवत आहोत. हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे आहेत. ते मी आयकर विभागाला सोपवले आहेत.’

सोमय्या पुढे काय करणार ?

उद्या सोमय्या हे मुंबईत ईडीकडे अधिकृत तक्रार करून पुरावे सादर करणार आहेत. तसेच, ते दिल्ली येथे जाऊन अर्थविभाग, ईडी, कंपनी मंत्रालय येथे देखील पुरावे सादर करणार आहेत अशी त्यांनी माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.

हसन मुश्रीफ यांची ओळख –

हसन मुश्रफी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. ते कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील आमदार आहेत. महाविकास आघाडीतील ग्रामविकास मंत्रिपद त्यांच्याकडे असून ते अहमदनगरचे पालकमंत्री देखील आहेत.

महत्वाच्या बातम्या :