बीडमध्ये १२५६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; १०६५ जणांनी केली कोरोनावर मात

बीड: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी आता कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. अनेक रुग्णांनी योग्य काळजी घेत व वेळेवर उपचार घेत कोरोनावर मात केली आहे. मात्र जिल्ह्यात कोरोनाचे संकट अजूनही असल्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. सोमवारी जिल्ह्यात नव्या १२५६ नव्या रुग्णांची भर पडली असून आता एकूण रुग्णांची संख्या ५८ हजार १२४ इतकी झाली आहे. तसेच ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, आता एकूण मृतांचा आकडा ९५९ इतका झाला आहे. मात्र १०६५ जणांनी कोरोनावर मात केली असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

जिल्ह्यात रविवारी तीन हजार ७४५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी दोन हजार ४८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर १२५६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक २७९ रुग्ण आढळले. अंबाजोगाई २३७, आष्टी १०१, धारूर ६४, गेवराई ५५, केज १४३, माजलगाव ८८, परळी १२२, पाटोदा ६५, शिरूर ४७, वडवणी तालुक्यातील ५५ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, ११ जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात बीड शहरातील आसेफनगरातील ७० वर्षीय पुरुष, गजानननगरातील ६१ वर्षीय महिला, तालुक्यातील जैताळवाडी येथील ६० वर्षीय महिला, येळंबघाट येथील ४१ वर्षीय महिला, खाडेवाडी येथील ५० वर्षीय महिला, शिरूर तालुक्यातील पाडळी येथील ६२ वर्षीय महिला, जरेवाडी (ता. धारूर) येथील ५५ वर्षीय महिला, माजलगाव तालुक्यातील गुंजवाडी येथील ७० वर्षीय महिला, माळेवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष, परळी तालुक्यातील सिरसाळा येथील ५८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. सोमवारी १०६५ जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ५० हजार ६०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण बळींची संख्या ९५९ इतकी झाली असल्याची माहिती जि.प. सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या