fbpx

मिठाई दुकानातून १२० किलो हलवा केला जप्त

सोलापूर : दूध आणि खव्यापासून मिठाई बनवणे असताना दूध पावडर आणि चुकीच्या तेलांचा वापर करून मिठाई बनवल्याप्रकरणी सोलापूर शहर अन्न औषध प्रशासनाने विडी घरकुलमध्ये कारवाई केली.

विडी घरकुल परिसरातील गोविंदराज मिठाई दुकानात ही कारवाई झाली. तब्बल २४ हजार रुपयांची १२० किलो हलवा मिठाई जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी दिली आहे.

या मिठाईत दूध, खवा किंवा अन्य घटक वापरणे गरजेचे होते. परंतु यात पावडर, इडीबल ऑइल यांचा वापर करून आकर्षक वेष्टनात ही मिठाई पॅक करण्यात आली होती. तसेच पुण्याहून ही मिठाई बॉक्स पॅकिंगमध्ये आले होते. यावर वत्सल मिठाई असे लाल रंगाचे बॉक्स होते. या कारवाईवेळी श्री. नारागुडे यांच्यासह अन्न निरीक्षक लोंढे यांनी काम पाहिले.

ग्राहकांनी सजग राहावे सदरचा साठा हा पेढे मिठाई बनवण्यासाठी घटक पदार्थ म्हणून वापरल्यास सर्वसामान्य जनतेची फसवणूक होऊ शकते. कारण सर्वसामान्यपणे मिठाई / पेढा म्हणजे दुधापासून बनवले जातात अशी अपेक्षा असते आणि अशापासून बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी अपायकारक फसवणूक करणारे ठरू शकतात. प्रतिबंध घालण्यासाठी कारवाई केली आहे.

सध्या सणावाराचे दिवस आहेत. जनसामान्य मिठाई, खवा, पेढे खरेदीसाठी बाजारात जातात. परंतु त्या खरेदी वेळी बॉक्सवरची तारीख त्यातील घटक पाहूनच खरेदी करावे – संजयनारागुडे, सहायक आयुक्त