स्वच्छ भारत योजनेसाठी 12 हजार 300 कोटींची तरतूद – निर्मला सीतारामन

टीम महाराष्ट्र देशा : स्वच्छ भारत योजनेसाठी 12 हजार 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. तसेच आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटी, ‘फिट इंडिया’ला प्रोत्साहन देणार, ‘आयुष्मान भारत’ अंतर्गत रुग्णालयांची संख्या वाढवणार, 2025 पर्यंत देश टीबीमुक्त करण्याचं लक्ष्य,’ असे सीतारामन म्हणाले.

याचप्रमाणे आता विमानातून जाणार कृषी सामान, नाशवंत मालासाठी कृषी उडाण योजना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मार्गावर योजना सुरु करणार, अशी घोषणाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. तसेच सेंद्रिय शेतीवर भर, 2025 पर्यंत दुग्ध उत्पादन दुप्पट करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती त्यांनी दिली.

Loading...

‘प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उथ्थान महाभियान’ (PM KUSUM) या पुढील काळात 20 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल. या अंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे पाण्याचे पंप दिले जातील,’ असे सीताराम म्हणाल्या. तसेच GST मुळे ग्राहकांना 1 लाख कोटींचा नफा झाला आणि ‘इन्स्पेक्टर राज’ही संपुष्टात आलं, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

दरम्यान, अर्थसंकल्पात गरीबांसाठी विविध योजना असून सबका साथ सबका विकास हे या सरकारचं सूत्र आहे. याचाच विचार अर्थसंकल्पातही करण्यात आला आहे असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
एकनाथ खड्सेंचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यास ; फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत