भुजबळांच्या तब्बेतीचे १२ वाजले; सरकार किती अवहेलना करणार?

भुजबळ आरोपी आहेत गुन्हेगार नाहीत

मुंबई: माजी मंत्री छगन भुजबळांच्या तब्बेतीचे वैद्यकीय सुविधां अभावी १२ वाजले आहेत. प्रकृती नाजूक असताना त्यांना वैद्यकीय सुविधांसाठी रांगेत उभे करुन जनरल वॉर्डमध्ये ठेवले जात आहे. सरकार करतंय तरी काय? असा प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत उपस्थित केला. छगन भुजबळ महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी कारागृहात आहेत.

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, छगन भुजबळांची प्रकृती नाजूक असताना त्यांना वैद्यकीय सुविधांसाठी रांगेत उभे करुन जनरल वॉर्डमध्ये ठेवले जात आहे. वैद्यकीय सुविधां अभावी त्यांच्या तब्बेतीचे १२ वाजले आहे. त्यांचा गुन्हा अजून सिध्द झालेला नाही.

माजी मंत्री आणि विद्यमान विधानसभा सदस्याची किती अवहेलना करणार? त्यांचे हिमोग्लोबीन ८ झाले आहे. तरी रांगेत उभे राहून कागदपत्रे दाखवून तपासण्या कराव्या लागतात. जनरल वॉर्डमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. भुजबळ आरोपी आहेत गुन्हेगार नाहीत. त्यामुळे माणुसकी दाखवून वैद्यकीय सुविधांची पुर्तता करण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले, भुजबळांना आरोग्याच्या सुविधा वेळेत पुरवण्याबाबत तुरुंग प्रशासनाला कळवण्यात येईल.

You might also like
Comments
Loading...