बार्शी कुर्डूवाडी रस्त्यासाठी आता डझनभर ग्राम पंचायतींचा एकत्र लढा

वेबटीम-बार्शी कुर्डूवाडी रस्ता हा मराठवाड्याच्या प्रवेशद्वाराचा मार्ग म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही वर्षापासून या रस्त्याची चाळण झाली असून ३४ किलोमीटरच्या मार्गात खड्डेच-खड्डे आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत अनेक वेळा निवदने देवूनही काहीच कारवाई होताना दिसत नाही. आता खड्डेमुक्त रस्त्यासाठी बार्शीमध्ये नागरिकांनी मोठे जनआंदोलन पुकारले आहे. खरंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा ही घोषणा केली.

Loading...

कारण इथे रस्त्यात खड्डे नाहीत तर खड्ड्यात रस्ता आहे. बरं हा रस्ता खराब होऊन फक्त वर्ष-दोन वर्षे झाली नाहीत तर गेल्या 10 ते 15 वर्षांपासून रस्त्याची दूरवस्था आहे. त्यामुळे परिसरातील डझनभर ग्राम पंचायतींनी एकत्र येऊन लढा उभा केला आहे.

बार्शी-कुर्डूवाडी हे अंतर जेमतेम 34 किलोमीटर. खड्ड्यांमुळे हा प्रवास दोन तासांचा झाला आहे. हे अंतर कापण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. दुचाकी असो की चारचाकी प्रवाशांचे हाल चुकलेले नाहीच. शासन आणि प्रशासन या रस्त्याकडे वळूनही पाहत नसल्याने अखेर हा प्रश्न जनतेने आपल्या हाती घेतला आहे. प्रश्न सुटेपर्यंत आंदोलनाची मालिका चालू ठेवली जाणार आहे. या आंदोलनात बार्शीतल्या सामान्य जनतेसह मार्गावरच्या ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग घेतला आहे.

बार्शी ते कुर्डूवाडी मार्गावर एकूण 12 ग्रामपंचायती येतात. या रस्त्याची अवस्था पाहण्यासाठी बार्शीतल्या सामान्य जनतेने एक सर्वेक्षण केलं. त्यानंतर बार्शी आणि कुर्डूवाडीसह या मार्गावरच्या सर्व गावांना एकत्रित करून व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. ज्याची सुरुवात गुरुवारपासून (14 सप्टेंबर) झाली. बार्शी तहसीलसमोर निषेधाच्या घोषणा देऊन आंदोलनाचा श्रीगणेशा झाला. सामान्य जनतेने उभा केलेला हा लढा पहिल्याच दिवसापासून परिणामकारक होत आहे.

बार्शी कुर्डुवाडी खड्डेमुक्त रस्त्यासाठी नागरिकांकडून वेगवेगळी अनोखी आंदोलने केली जात आहेत, सार्वजनिक बांधकाम आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या गाढवाचे लग्न लावण्यात आले, आणि आता 12 ग्रामपंचायत मिळून एकत्र लढा देत आहेत, त्यामुळे किमान आता तरी सरकारला जाग येणार का हे पाहन महत्वाचे ठरणार आहे

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने