fbpx

12 कलाकार शरद पवारांना कलाकृतींद्वारे देणार मानवंदना !

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 12 चित्रकार व शिल्पकार त्यांच्या कलाकृतीतून शुभेच्छा देऊन मानवंदना देणार आहेत. तसेच, या कलाकृतींच्या विक्रीतून येणाऱ्या पैशांतील 50 टक्के रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे, अशी माहिती चित्रकार श्रीकांत कदम, चित्रकार प्रा. सतीश काळे व अक्षय शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष आर. एन. शिंदे यांनी आज पत्रकार परिषेदत दिली.

शरद कला क्रीडा प्रतिष्ठान पुणे आणि अक्षय शिंदे फाउंडेशनच्या यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवारी (12 डिसेंबर) बालगंधर्व रंगमंदिर येथे या कार्यक्रमाचे सकाळी 11 वाजता उद्घाटन होणार असून, कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृती 14 डिसेंबरपर्यंत बालगंधर्व रंगमंदिर कलादालन येथे नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. 10 व 11 डिसेंबर रोजी हे कलाकार बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांची कलाकृती साकारणार आहेत. 12 ते 14 डिसेंबर दरम्यान या कलाकृतींचे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

पवारांच्या गाडीचे सारथ्य रेवती सुळे यांच्याकडे, नातंही आता सक्रीय होणार ?

या उपक्रमासाठी श्रीकांत कदम, प्रा. सतीश काळे, तुकाराम जाधव, बाळासाहेब अभंग, प्रा. संतोष शिर्के, जितेंद्र सुतार, प्रशांत बंगाळ, सयाजी वाघमारे, दीपक वानखेडे, प्रा. मंगेश शिंदे, राम खरटमल व बापुसाहेब झांजे हे कलाकार त्यांची कलाकृती साकारणार आहेत.

शरद पवार हे भारतीय राजकारण, समाजकारण, अर्थकारण व ग्रामीण तसेच शहर विकासाच्या क्षेत्रातील अग्रगण्य व सर्वांनाच आदरणीय असे व्यक्तिमत्व आहे. याच कारणास्तव त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्याबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने हे कलाकार त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत.

पवारांच्या गाडीचे सारथ्य रेवती सुळे यांच्याकडे, नातंही आता सक्रीय होणार ?