युवराज, रहाणे,गेलसह११२२ खेळाडूंवर लागणार बोली

ipl 2018

टीम महाराष्ट्र देशा- इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) अकराव्या हंगामासाठीच्या क्रिकेटपटूंच्या लिलावाचा आराखडा तयार झाला आहे. भारताच्या क्रिकेटपटूंमध्ये अष्टपैलू युवराज सिंगसह ऑफस्पिनर हरभजन सिंग आणि सलामीवीर गौतम गंभीर तसेच परदेशी क्रिकेटपटूंमध्ये इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटसह फटकेबाज सलामीवीर ख्रिस गेल आणि इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सला नेमकी किती बोली लागते आणि कुठली फ्रँचायझी करारबद्ध करते, याची उत्सुकता लागून राहिली आहे.नवीन सत्रासाठी २७ आणि २८ जानेवारीला बंगळुरूमध्ये लिलाव होणार आहे. या लिलावामध्ये हजाराच्यावर खेळाडूंवर बोली लागणार आहे. जगभरातील तब्बल ११२२ खेळाडू या लिलावामध्ये सहभागी होणार असून त्यांची नोंदणी झाल्याची माहिती बीसीसीआयने ट्विटरवरून दिली.

Loading...

या लिलावात जगभरातील खेळाडू आहेत. त्यात अर्थातच युवराज सिंग, गौतम गंभीर, आर अश्विन, अजिंक्य रहाणे यांना जास्त भाव मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कुलदीप यादव, केएल राहुल, मुरली विजय, हरभजन सिंग यांना किती किंमत लाभते, याकडेही लक्ष असेल. आंतरराष्ट्रीय खेळाडूत ख्रिस गेल आणि बेन स्टोक्स आहेत. इंग्लंड कर्णधार जो रुट प्रथमच या लिलावात असेल. यापूर्वी केवळ इऑन मॉर्गन, केविन पीटरसन, जेसन रॉय, सॅम बिलिंग्ज आणि स्टोक्स हेच इंग्लंडचे खेळाडू आयपीएल खेळले आहेत. सर्वाधिक पायाभूत रक्कम दोन कोटी असलेल्या खेळाडूत धवन, रहाणे, विजय यांच्यासह युझवेंद्र चाहल, केदार जाधव, कर्ण शर्मा, रॉबिन उथप्पा आहेत.

सहभागी क्रिकेटपटू : ११२२

 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले : २८१

 आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेले : ८३८

 आयसीसी संलग्न देशांचे क्रिकेटपटू : ३

 भारताचे नवोदित क्रिकेटपटू : ७७८

परदेशी क्रिकेटपटू : २८२

देश आणि खेळाडूंची संख्या
अफगाणिस्तान १३
ऑस्ट्रेलिया ५८
बांगलादेश ८
इंग्लंड २६
आयर्लंड २
न्यूझीलंड ३०
स्कॉटलंड १
द. आफ्रिका ५७
श्रीलंका ३९
अमेरिका २
वेस्ट इंडीज ३९
झिंबाब्वे ७

प्रमुख आकर्षण

ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया).

जो रूट, बेन स्टोक्स, इयॉन मॉर्गन (इंग्लंड).

ख्रिस गेल, ड्वायेन ब्राव्हो, कालरेस ब्राथवेट (वेस्ट इंडिज).

हशिम अमला, फाफ डु प्लेसिस, क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, मॉर्नी मॉर्केल, कॅगिसो रबाडा (द. आफ्रिका).

केन विल्यमसन, कॉलिन मुन्रो, टॉम लॅथम (न्यूझीलंड).Loading…


Loading…

Loading...