fbpx

झारखंडमध्ये जवानांवर हल्ला; ११ जवान जखमी

टीम महाराष्ट्र देशा : झारखंड नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यासाठी निघालेल्या कोब्रा जवान आणि झारखंड पोलिसांच्या तुकडीवर आयईडी बॉम्ब हल्ला करण्यात आला. हा हल्ला झारखंडच्या कुचाई भागात करण्यात आला आहे. यात कोब्रा बटालियनचे ८ तर पोलिसांचे ३ जवान जखमी झाले आहेत.

महिनाभरापूर्वी महाराष्ट्रातील गडचिरोलीतही अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये तब्बल १५ जवान शहीद झाले होते. अशाच प्रकारचा हल्ला आज झारखंडमध्ये करण्यात आला आहे. सर्व जखमी जवानांवर रांचीतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.