नाशिकमध्ये बनावट नोटा जप्त

 

नाशिक – नाशिक पोलिसांनी गुरुवारी रात्री केलेल्या या कारवाईत दीड कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.नाशिक पोलिसांनी ज्या ११ जणांना अटक केली आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-याचाही समावेश आहे. राष्ट्रवादीचा युवक अध्यक्ष छबु नागरे आणि रामराव पाटीलयांच्यासह 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

नाशिक पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई करुन 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या बनावट नोटा जप्त केल्या. तर 1 लाख 80 हजाराच्या जुन्या खऱ्या नोटा, सुमारे दीड लाखांच्या दोन हजारांच्या नव्या नोटा, अशा एकूण 1 कोटी 39 लाखांच्या नोटा हस्तगत केल्या.

 

बनावट नोटा छापत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. नोटा बदलून देण्याच्या नावाखाली लूट करत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार कारवाई करत 11 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तसंच त्यांच्याकडून 3 आलिशान कारही जप्त केल्या.