अतिवृष्टी व पूरग्रस्तांना ११ लाखांची मदत मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द; अब्दुल सत्तारांचा पुढाकार!

udhav thackrey

औरंगाबाद : राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मदत व्हावी यासाठी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सूचना व मार्गदर्शनाने मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी सिल्लोड नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी महासंघ व शिवसेना – युवासेनेच्या वतीने जमा करण्यात आलेल्या ११ लाखांचा धनादेश युवानेते अब्दुल समीर तसेच जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पाटील गाढे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.

शुक्रवारी ( दि. १७ ) औरंगाबाद येथील जिल्हा परिषद इमारत बांधकाम भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री औरंगाबाद येथे आले होते. या कार्यक्रमात सिल्लोड कडून ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार आदी उपस्थित होते. राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्तांच्या मदतीसाठी युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या उपस्थितीत सिल्लोड येथे मदत फेरी काढण्यात आली होती.

राज्यातील पीडितांना मदत करण्याचे अवाहन यावेळी श्री. समीर यांनी विविध संस्था व नागरिकांना केले होते. त्या अनुषंगाने सिल्लोड कडून ११ लाखांची मदत मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी जमा करण्यात आली. यापूर्वी ही महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागरिकांना अवाहन करीत आर्थिक मदत केलेली आहे. पीडितांना मदत व्हावी यासाठी दानशूर व्यक्ती, संस्थांनी मदत करावी असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या