वर्धा नदीत बोट उलटून ११ जण बुडाले; आतापर्यंत चौघांचे मृतदेह लागले हाती

vardha

अमरावती : अमरावती जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे, वर्धा नदीत एक बोट बुडाल्याची घटना काही वेळापूर्वी घडली आहे. जिल्ह्यातील वरूड तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना सकाळी घडली आहे.

आतापर्यंत नावाड्यासह चौघांचे मृतदेह सापडले असून इतर लोकांना शोध बचाव पथकाने सुरू केला आहे. बेनोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बुडालेले सर्वजण बोटीतून फिरण्यासाठी गेले होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच सध्या मिळालेल्या माहितीनुसार एकाच कुटुंबातील 11 जण दशक्रियेच्या विधीसाठी गाडेगावातील मटरे कुटुंबीयांकडे आले होते.

दशक्रियेचा विधी आटोपल्यानंतर आज सकाळी नरखेड तालुक्यातील झुंज येथे फिरायला गेले. वर्धा नदीच्या पाण्यातून महादेवाचे दर्शन घेण्यासाठी होडीतून प्रवास करत होते. त्यावेळी, होडी पलटी झाल्यामुळे 11 जण नदीत बुडाले. त्यात महिलांचासुद्धा समावेश असलायची देखील माही मिळत आहे. नदीत बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोहचले. आतापर्यंत चौघांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि चिमुकलीचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या