मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी 46 आमदार सोबत घेऊन वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता महाविकासाआघाडीला मोठा धोका निर्माण झाला आहे. याआधीच सरकार कोसळण्याच्या दिशेने सध्या घडामोडी सुरु आहेत. शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे संकेत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलेत. यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधलाय.
राजकीय वर्तुळातून सध्या मोठ्या बातम्या समोर येत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदारांचे जास्त संख्याबळ असल्याची माहिती माध्यमांतून समोर येत आहे. जवळपास ४६ आमदारांनी शिंदेंना पाठींबा दिलाय. यावरूनच निलेश राणेंनी ट्विट केलय. शिवसेनेचे 11/12 आमदार शिवसेने सोबत राहतील अशी परिस्थीती आहे. पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. हे 11/12 घेऊन IPL team साठी तयारी करा… मातोश्री 11 बनवा. असं ट्विट राणेंनी केलय.
दरम्यान, माझ्या सोबत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचे ४६ आमदार आहेत. आता या आमदारांना मुंबईत आणणार की नाही ती प्रक्रिया पार पाडून निर्णय घेऊ. मात्र मला गटनेतेपदावरून हटवणे हे अवैध आहे. असं मला गटनेतेपदावरून हटवता येत नाही. आमदारांच्या बहुमताने गटनेता निवडता येतो. त्यामुळे अजय चौधरी यांची निवड ही चुकीची आणि घटनाबाह्य आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :