fbpx

11 मे पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर

modi a

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मे रोजी नेपाळच्या दौऱ्यावर जात आहेत. दोन्ही देशांसाठी हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मण्यात येत आहे. या पूर्वी नेपाळचे पंतप्रधान केपी ओली देखील भारत दौऱ्यावर आले होते.

काठमांडूला जाण्यापूर्वी नरेंद्र मोदी दक्षिण नेपाळमधील जनकपूर येथे जानकी मंदिराला भेट देतील तसेच वायव्य नेपाळमधील मुस्तांग जिल्ह्यातील मुक्तीनाथ मंदिरालाही ते भेट देणार आहेत. मुस्तांग आणि काठमांडूला जाण्यापूर्वी जनकपूर येथील प्रांतिक सरकार नरेंद्र मोदी यांचा नागरी सत्कार करणार आहे. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान 900 मेगावॅट क्षमतेच्या वीजप्रकल्पाचे उद्घाटनही करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यासाठी मुस्तांग, जनकपूरसह इतर जिल्ह्यांमध्ये संरक्षण व्यवस्था कडक करण्यात आली आहे

नेपाळदौऱ्यानंतर पंतप्रधान शांतीनिकेतन येथे बांगलादेश भवनच्या उद्घाटनासाठी जाणार आहेत. तेथे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांचीही ते भेट घेतील. हे भवन बांगलादेश सरकारच्या मदतीने बांधण्यात आले आहे. या वर्षी बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. भारतही बांगलादेशबरोबर विविध प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या प्रयत्नात आहेत.