दहावी, बारावीचे फुटलेले पेपर पुन्हा होणार! सीबीएसईचा निर्णय

नवी दिल्ली:  पेपरफुटीमुळे दहावी, बारावीची परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने( सीबीएसई) घेतला आहे. दहावीचा गणिताचा आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा होणार आहे. त्याबाबतचं वेळापत्रक लवकरच सीबीएसईच्या वेबसाईटवर जाहीर होणार असल्याचे वृत्त आहे.

यावर्षी दहावी, बारावीची परीक्षा सुरु असतांना पेपरफुटीचे अनेक प्रकाराने समोर आले होते. अनेक प्रकरणामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा हात असल्याचे समोर आले होते. सीबीएसईने पेपरफुटीमुळे मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेचे वेळापत्रक लवकरच सीबीएसईच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे.