अकोला शहरातील १०४ गुन्हेगार हद्दपार

अकोला : अकोला शहरातील कावड यात्रा व पोळा सणानिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी CRPC कलम १४४(२) नुसार अकोला उपविभागीय दंडाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी १०४ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीना २० ऑगष्ट व २१ ऑगष्ट या दोन दिवसांकरीता अकोला शहरातुन हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

अकोला शहराचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वराला शिवभक्तांद्वारा श्रावण मासातील अखेरच्या सोमवार ला भवदिव्य स्वरूपात विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवभक्त करीत असतात या निमित्त श्रीराजेश्वराला गांधीग्राम येथील पूर्णा नदीतील जल शिवभक्त कावडधारक कावडीने आणून शिवलिंगाला महाजलाभिषेक करीत असतात.

त्यानिमित्त रविवार २० ऑगष्ट ला गांधीग्राम येथे शिवभक्त कावड घेऊन जाणार आहेत तर सोमवार २१ ऑगष्ट ला कावडीने जल आणणार आहेत यावेळी शेतकऱ्यांचा सण पोळा सुध्दा २१ ऑगष्ट ला एकञ आला असल्याने श्रीराजराजेश्वर यांना महाजलाभिषेका निमित्त भव्य शोभायाञा तसेच बैलाचा सण पोळा निमित्त शहरा मध्ये पोळा भरविण्यात येत असतो यावेळी दोन्ही धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रम एकञ आल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी चे गुन्हेगार या कार्यक्रमामध्ये कायदा व सुव्यवस्था ला बाधा पोहचविण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अकोला उपविभागीय दंडाधिकारी प्रा.संजय खडसे यांनी विशेष खबरदारीच्या दृष्टीकोनातून अकोला शहरातील कावड व भव्य शोभायाञा तसेच पोळा सणानिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी सिआरपिसी कलम १४४(२) नुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना रविवार २० ऑगष्ट व २१ ऑगष्ट या दोन दिवसांकरीता अकोला शहरातून हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.